भुसावळ प्रतिनिधी । जामनेर रोडवर उभ्या असलेल्या तीन लक्झरीमधून मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दोन लाखांचा ऐवज चोरी केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
याबाबत माहिती अशी की, लॉकडाउन दरम्यान सहा महिन्यांपासून जामनेर रोड वरील उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्या कार्यालया समोरील साईबाबा मंदिरा जवळील आवारात समर्थ कृपा ट्रॅव्हल्स मालक किशोर माळी राहणार शिव कॉलनी यांची (एम.एच.४६ जे ०६०७), भैरवनाथ ट्रॅव्हल्स मालक हेमंत ठाकरे राहणार शिव कॉलनी यांची (एमएच ०४ जीपी ९७९६), जय भवानी ट्रॅव्हल्स मालक रोहित रोकडे राहणार शिव कॉलनीतील असून (एमएच ०४ एफके ३६६१) या तिघेही लक्झिरीमधून एलसीडी, म्युझिक सिस्टम अंदाजे २ लाखांचा ऐवज ९ सप्टेंबर २०२० रोजी मध्यरात्री पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनाने आलेल्या अंदाजे ५ अज्ञात इसमांनी २.१५ वाजेला येऊन २.५८ वाजेला तिघे लक्झिरीमधून चोरी करून नहाटा कॉलेजच्या रस्त्याने पोबारा होतांना साईबाबा मंदिराच्या सी.सी.टी.व्ही.कॅमेऱ्यात कैद झाले आहे.अशी माहिती लक्झिरी मालकांनी दिली.
घटनास्थळी १० सप्टेंबर २०२० बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्या आदेशावरून सहा पोलीस निरीक्षक मंगेश गोटले, गुन्हे शोध पथकाचे पोना रमण सुरळकर, प्रशांत परदेशी, वाहन चालक बंटी कापडणे यांनी भेट देऊन साईबाबा मंदिरावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासणी करून त्या दिशेने तपास सुरू केला आहे. याबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/771700966706203/