भुसावळ येथील उपस्टेशन मास्तरची आत्महत्या


भुसावळ प्रतिनिधी । शहरातील नगरपालिका दवाखान्यामागील कुलकर्णी प्लॉट भागातील रहिवाशी मिलिंद दिवाकर मार्कंडे यांनी सायंकाळी टिंबर मार्केट जवळ आत्महत्या केल्याची घटना घडली.

मध्य रेल्वे ओ.पी.टी.जी.विभागात भुसावळ रेल्वे प्लॅटफॉर्म नंबर 4 वर उप स्टेशन मास्टर पदावर कार्यरत असलेले मिलिंद दिवाकर मार्कंडे (वय 54) हे कार्यरत होते.दिनांक 1 मार्च 2020 रोजी सायंकाळी 6.10 वाजेच्या पूर्वी त्यांनी रेल्वे रुळावर मान ठेवून आत्महत्या केल्याची घटना घडली.आत्महत्या केल्याचे नेमके कारण समजू शकले नाही.ही घटना खंबा नंबर 443/बी/4-1 जवळ घडली.लोहमार्ग पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू नोंद 174 सी.आर.पी.सी प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.तपास लोहमार्ग पोलीस सपोनि बबन दिगंबर शिंदे करीत आहे.

Protected Content