भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील समृध्दी पार्क येथे एकाचे बंद घर फोडून घरातून चांदीचा दिवा आणि रोकड असा एकुण ३४ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की, विजय सुरेश गोरे (वय-५८) रा. समृध्दी पार्क, भुसावळ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० ते सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान त्यांचे घर बंद असतांना अज्ञात चोरट्याने घरातून एक चांदीचा दिवा आणि रोकड असा एकुण ३४ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी विजय गोरे यांनी भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक महेश चौधरी करीत आहे.