भुसावळ पालिकेची सर्वसाधारण सभा; विकासकामांच्या प्रस्तावांना मंजुरी

भुसावळ प्रतिनिधी । प्रदीर्घ काळापासून उत्सुकता असणारी भुसावळ नगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज ऑनलाईन या प्रकारात पार पडली. यात विविध कामांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.

कोरोनाच्या आपत्तीमुळे भुसावळ पालिकेची सर्वसाधारण सभा लॉकडाऊन लागल्यापासून झाली नव्हती. मध्यंतरी ऑनलाईन या प्रकारात सभा घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र कायमस्वरूपी मुख्याधिकारी नस्याने हा विषय मार्गी लागला नव्हता. तथापि, संदीप चिद्रवार यांच्या माध्यमातून मुख्याधिकारी मिळाल्यानंतर आज ऑनलाईन सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले.

आजच्या सभेत नगराध्यक्ष रमण भोळे व मुख्याधिकारी संदीप चिद्रवार हे नगरपालिकेतून सहभागी झाले. काही नगरसेवक हे नगरपालिकेतून सहभागी झाले. तर अन्य नगरसेवक हे ठिकठिकाणाहून या सभेत सहभागी झाली. या सभेत विविध २४२ कामांना मंजुरी देण्यात आली. यात शहराच्या विकासाला चालना देणार्‍या कामांचा समावेश आहे. यामुळे शहराच्या कामांना गती मिळणार असल्याचा विश्‍वास नगराध्यक्ष व मुख्याधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

Protected Content