Home धर्म-समाज भुसावळ नगरपालिकेत राष्ट्रीय मतदार दिवस साजरा

भुसावळ नगरपालिकेत राष्ट्रीय मतदार दिवस साजरा

0
25


 

भुसावळ, प्रतिनिधी । राष्ट्रीय मतदार दिवस दरवर्षी २५ जानेवारी रोजी देशभर साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येक भारतीय मतदारांसाठी, नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचा असून या पार्श्वभूमीवर भुसावळ नगरपालिकेत देशाच्या प्रत्येक निवडणुकीत सहभागी होऊन आपली जबाबदारी पार पाडण्याची शपथ घेण्यात आली.

राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने भुसावळ नगरपालिकेत घेण्यात आलेल्या शपथप्रसंगी नगरध्याक्ष रमण भोळे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, उपमुख्यधिकरी महेंद्र कातोरे, सभा अधिक्षक परवेज शेख, आस्थापना प्रमुख चेतन पाटील, आस्थापना विभाग लिपिक वैभव पवार, अभियंता नितीन लुंगे, सुरज नारखेडे सतीश देशमुख, विजय तोषणीवल, आदी कर्मचारी होते.


Protected Content

Play sound