भुसावळ ते यावल एसटीची रात्रीची बस सेवा बंद ; प्रवाशांना आर्थिक भुर्दंड

 

यावल प्रतिनिधी । येथील एसटी आगारातुन रात्रीच्या वेळी सोडण्यात येणाऱ्या भुसावळकडून  यावल येण्यासाठी बसेस नसल्याने प्रवासांना अनेक अडचणी सामोरे जावे लागत आहे.  यावलचे आगार प्रमुखांना विविध सामाजिक संस्थानी आणि राजकीय पक्षांनी निवेदन देवुन देखील या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रवासी वर्गात मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होत आहे.

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की , कोरोनाच्या प्रकोप कमी झाल्याने आता अनलॉकची प्रक्रिया सुरु असतांना यावल आगारातून काही प्रमाणात  बससेवा सुरू करण्यात आली आहे. यात यावल ते भुसावळ बस सेवा रात्री बंद असल्याने प्रवाशांना खाजगी वाहनातून जादा पैसे देऊन प्रवास करावा लागत असून यात प्रवाशांची खाजगी वाहनधारक आर्थिक लुट करत असल्याची तक्रार करण्यात येत आह. 

यावल ते भुसावळ ही एसटी बस सेवा रात्री ८ ते १० वाजेच्या दरम्यान बंद ठेवण्यात येत आहे. याकालावधीत रात्री रेल्वेव्दारे बाहेरगावाहुन भुसावळ येथे येणारे प्रवाशांना यावल येथे येण्यासाठीची बस सेवा बंद असल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यात प्रवाशी महीला व लहान मुलांना मोठा त्रास सोसावा लागत आहे.  याच संधीचा फायदा घेत काही खाजगी अवैध वाहतुक करणाऱ्यांकडुन प्रवासांकडून अव्वा की सव्वाभाडे वसूल केले जात असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. प्रवासांची ही अडचण डोळ्यापुढे ठेवत एसटी महामंडळाच्या वरिष्ठांनी या प्रश्नाकडे लक्ष देवुन भुसावळ येथून यावलकडे रात्री ८ ते १० पर्यंतची बससेवा पुर्वरत करावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. 

 

Protected Content