वरणगाव प्रतिनिधी | भुसावळ तालुक्यात शिवसेनेची संघटना मजबूत करा. शिवसेनेला गतवैभव मिळवून देण्यासाठी केवळ इतिहासात रमून न जाता, वर्तमान काळ समजून घ्या. शिवसेनेचा भविष्यकाळ उज्वल आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये यश तुमचंच आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे रावेर लोकसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख विलास पारकर यांनी आज भुसावळ येथे केले.
भुसावळ येथील मोरया लॉन्स मधील सभागृहात आयोजित केलेल्या शिवसेनेच्या आढावा बैठकीत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, रावेर लोकसभाचे उपसंघटक विलास मुळे, उपजिल्हाप्रमुख प्रा. उत्तम सुरवाडे, उपजिल्हाप्रमुख डॉ. मनोहर पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रल्हाद महाजन, उर्दू विभाग अल्पसंख्यांक शिक्षकसेनेचे प्रमुख एलियाज, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक प्रा. धीरज पाटील, शहर प्रमुख नीलेश महाजन, शहर प्रमुख बबलू बऱ्हाटे, महिला आघाडी जिल्हा संघटिका पुनम बऱ्हाटे, तालुका संघटिका भुराबाई चव्हाण, माजी तालुकाप्रमुख निळकंठ फालक, पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, जिल्हा युवा अधिकारी चंद्रकांत शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवसेना घरा घरात पोहचवा..
शिवसेनेच्या आढावा बैठकीत येणाऱ्या सहकार क्षेत्रातील कृषी बाजार उत्पन्न समिती, जिल्हा बँक निवडणूक, वरणगाव व भुसावळ येथील नगरपालिका निवडणूक, आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती, इत्यादी निवडणुकां बाबत शिवसेनेच्या तयारीचा आढावा घेताना विलास पारकर आणि जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी पदाधिकार्यांशी वैयक्तिक चर्चा करून मते जाणून घेण्यात आली. महिनाभराच्या आत शहरात आणि ग्रामीण भागात शिवसेनेच्या शाखांची बांधणी करून लवकरात लवकर शाखांचे उद्घाटन करा. शिवसेना घरा घरात पोहचवा. सदस्य नोंदणी मतदार नोंदणी याबाबत मरगळ झटकून कामाला लागा, असे आदेश त्यांनी पदाधिकारी आणि शिवसैनिकांना दिले. निवडणूका येतात आणि जातात. संघटनेची बांधणी मजबूत असेल, कार्यकर्ते सक्रीय असतील निवडणुकांना आत्मविश्वासाने सामोरे जाता येते. निवडणुकीत यश प्राप्त करता येते, असे मार्गदर्शनपर भाषणात सांगत, जुन्या-नव्या शिवसैनिकांची उपस्थिती, महिलांची लक्षणीय उपस्थिती, याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
शिवसैनिकांनी कशी पूर्वतयारी करावी….
या आढावा बैठकीत उपजिल्हाप्रमुख डॉ. मनोहर पाटील, जामनेर, उपजिल्हाप्रमुख प्रल्हाद महाजन रावेर यांनी निवडणुकीत कसे यश संपादन करावे, त्यासाठी पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी कशी पूर्वतयारी करावी यासंबंधी मोलाचे मार्गदर्शन केले. उपजिल्हाप्रमुख प्रा उत्तम सुरवाडे मार्गदर्शन करताना म्हणाले की, निवडणुकीतील हमखास यशासाठी मतदार याद्यांची भगवद्गीते प्रमाणे पारायणं केली पाहिजे. बुथ प्रमुखांनी यादीचा सखोल अभ्यास केला पाहिजे. ग्रामीण आणि शहरी भागात जास्तीत जास्त शिवसेना सदस्य नोंदणी करून पक्षाचा पाया मजबूत केला पाहिजे. पदाची जबाबदारी ओळखून पदाधिकाऱ्यांनी स्वतःला पक्ष कार्यात झोकून दिले पाहिजे. कार्यकर्त्यांनी सजग राहिले पाहिजे. शिवसैनिकांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात ऍड निर्मल दायमा यांनी आपल्या भावना व्यक्त करत, भुसावळ नगरपालिकेत यापूर्वी गतकाळात कसे यश संपादन केले आणि पुढील काळात यश मिळवण्यासाठी आपण सगळ्यांनी एकजुटीने काम केले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. धीरज पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन बबलू बऱ्हाटे यांनी केले.
बैठकीला उपतालुकाप्रमुख हिरामण पाटील, पप्पू बारसे, सुभाष चौधरी, समाधान पाटील, प्रकाश कोळी, नगरसेवक मुकेश गुंजाळ, माजी नगरसेवक दीपक धांडे, माजी नगरसेवक ऍड. कैलास लोखंडे, सदाशिव पाटील, रेल कामगार सेनेचे ललित मुथा, ऍड निर्मल दायमा, शहर संघटक योगेश बागुल, नबी पटेल, नमा शर्मा, सोनी ठाकूर, ऍड. मनोहर खैरनार, नाना मोरे, शरद जैस्वाल, अमोल पाटील, ग्राहक संरक्षण कक्षाचे मनोज पवार, प्रकाश कोळी, नीलेश ठाकूर, राहुल बावणे, निलेश सुरळकर, भैया देशमुख, पिंटू नागपुरे, रामदास पाटील, रमाकांत चौधरी, माजी शिक्षकसेना पदाधीकारी गजानन निळे, युवासेनेचे तालुका युवाअधिकारी हेमंत बऱ्हाटे, शहर युवाअधिकारी सुरज पाटील, विकी चव्हाण, पवन बाकसे, सुरेंद्र सोनवणे, पंकज पाटील, किशोर कोळी, महिला कविता कोळी, योगिता सोनार, ज्योती अग्रवाल, जयश्री महाजन, वैशाली विसपुते, दिनेश बुंदेले, शरद जोहरे, कैलास जाधव, शहरी आणि ग्रामीण भागातील अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.