भुसावळ प्रतिनिधी – येथील संविधान बचाव समितीतर्फे सुरु असलेल्या साखळी उपोषणच्या ६व्या दिवशी सुद्धा लोकांनी सहभाग घेतला. सकाळी ११ वाजता काही ख्रिस्ती भगिनींनी या उपोषणाला पाठींबा दिला आहे. यावेळी एमआयएमच्या जिल्हा कमिटी व शहर कमिटी व असंख्य कार्यकर्त्यांनी या संदर्भात निवेदन देवून याबाबत मागणी केली.
यावेळी फिरोज शेख, भुसावळ शहर अध्यक्ष अशरफ तडवी, जिल्हा सचिव कलिम शेख, युवा शहराध्यक्ष नावेद खान, इलियास पटेल, हरिस शेख, आवेस शेख, हाफिज रईस, शेख साजिद रौशन, शहेबाज खान, राजेंद्र वानखेडे व अन्य कार्यकर्ता उपस्थित होते. तसेच या वेळी समितीचे अध्यक्ष सलीम सेठ चुडी वाले, युनूस मामा, फरहान शेख, अझहर चॅम्पियन, अश्रफ कुरेशी, जुनेद खान,आबीद भाई,दानिश पटेल,डॉ इम्रान खान, ॲड.ऍड ऐहतेशम मलिक, फारूक खान, अकील सर यासह समिती सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार समितीचे खजांची साबीर मेम्बर यांनी केले.
उपोषणाला यांनी दिला पाठिंबा
जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, युवा जिल्हा अध्यक्ष बाळा पवार, दिनेश इखारे, वंदना सोनवणे,संगीता भामरे व असंख्य कार्यकर्ता उपस्थित होते. याप्रसंगी फिरोज शेख,अश्रफ तडवी, विनोद सोनवणे, बाळा पवार अन्य मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.