भुसावळ प्रतिनिधी । जिल्ह्यासह राज्यात कोरोना विषाणूने कहर केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र शहरात संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४० जणांना पोलीसांकडून दंडात्मक कारवाई केली आहे.
भुसावळ शहरातील नागरिकांना वारंवार सूचना देऊनही नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत सकाळी ११ ते रात्री ७ वाजेपर्यंत महत्त्वाच्या कामांसाठी नागरिकांना सूट दिली आहे. परंतु नागरिक विणकामाचे बाहेर फिरताना दिसत आहे. त्यामुळे आज बाजारपेठ पोलिस स्टेशनच्या माध्यमातून जवळपास ४० लोकांवरती कलम १८८ नुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये, अशा सूचना दिल्या असून जिल्ह्याच्या बाहेरून आलेल्या नागरिकांचाही आम्ही शोध घेत असून त्यांच्यावरही कारवाई करणार असल्याची माहिती भुसावळचे डीवायएसपी गजानन राठोड यांनी दिली आहे.