भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील ॐ सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान संचलित, वासुदेव जेष्ट नागरिक संघाच्या ७ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित जेष्ठ नागरिक दंत आरोग्य आणि निगा याबाबत श्री सिद्धीविनायक दातांचा दवाखाना संचालक डॉ. यशेंद्र पाटील यांनी मार्गदर्शन केले.
ते म्हणाले की, जेष्ठ नागरिकांनी उतारवयासोबत दातांची पुरेशी काळजी घेतली तर नक्कीच उतारवयात सुद्धा तुम्ही दातांच्या मदतीने अक्रोडचे फळ सहजपणे फोडू शकतात. “मोत्यासारखे दात,त्यांना आरोग्याची साथ,” असे प्रतिपादन देखील डॉ.यशेंद्र पाटील यांनी आज केले.
याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष धनराज पाटील, सचिव प्रभाकर झांबरे, उपाध्यक्ष विश्वनाथ वाणी उपस्थित होते. डॉ. डॉ.यशेंद्र पाटील यांनी याबाबत जेष्ठ नागरिकांमध्ये जनजागृती करत महत्वपूर्ण बाबी सांगितल्या, यात वय वर्षे ४० नंतर दर वर्षी नियमित दंत तपासणी करावी, थंड पाणी पिल्यावर ठणक लागणे हे दात किडण्याचे लक्षण आहे. सकाळी आणि रात्री दोन्ही वेळेस दात साफ करणे आवश्यक असून जेवण झाल्यावर किमान १० ते १२ वेळा पाण्याच्या गुळण्या कराव्यात. जास्त गोड आणि गरम पदार्थ खाण्याचे टाळावेत. आता नव नवीन दंत शोध लागण्याने दंत चिकित्सा सुलभ झाली आहे. फसव्या जाहिरातीच्या आधारे आपल्या दातांशी काहीही प्रयोग करू नका. हानिकारक पदार्थ,गुटखा ,सिगारेट आदी पासून दूरच राहा. भारतात दातांचा कर्करोगाचे प्रमाण वाढत असून ते जीवघेणे ठरत आहे. भरपूर शारीरिक आजाराचे मूळ हे दातांच्या आजाराद्वारे निदान केले जातात. असे मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ.यशेंद्र पाटील यांनी जेष्ठ नागरिकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना उत्तरे देत जनजागृती करत महत्वपूर्ण बाबी सांगितल्या.
यावेळी सोनू भिरूड, अजराम चौधरी, यशवंत वारके,, शरद लोखंडे, प्रमोद बोरोले, रामण भोगे, पुंजो भारंबे, लोटू फिरके, भानुदास पाटील, मधुकर पाटील, प्रभाकर शिंपी, मधुकर दौलत पाटील, इंदू पाटील, वैशाली पाटील, भारती बेंडले, इंदुबाई सपकाळे, प्रमिला चौधरी, ज्योती चौधरी, छबु झांबरे आदी जेष्ठ नागरिक उपस्थित होते. आभार प्रदर्शन प्रभाकर झांबरे यांनी केले.