भुसावळ प्रतिनिधी । आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या सर्व विभागातील वरीष्ठ विभागातर्फे महिलांना गुलाब देऊन सन्मानित केले.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक विवेक कुमार आणि विभागीय वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला कोच केअर सेंटर, भुसावळ येथील महिला देखभाल गँगच्या प्रमुख दर्शना साखरे यांना साधन (टूल) किट दिले.
सदर गँग देखभाल दुरुस्तीचे काम कार्यक्षमतेने करणार आहे, ज्यामध्ये कोचची अंडर गियर, चाके, ब्रेक सिस्टम आणि कोचची अंतर्गत फिटिंग्ज यासारख्या महत्त्वाच्या भागाची देखभाल केली जाते.