भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ बायपासवर उतरण्याच्या कारणावरून बस वाहक आणि एका पक्षाच्या जिल्हाध्यक्षात धक्काबुक्की झाल्याची घटना आज दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. दोघांच्या वादामुळे वाहतूकीची मोठी कोंडी झाली होती.
भुसावळहून औरंगाबादकडे निघालेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस क्रमांक (एमएच 20 बीएल 2364) या औरंगाबाद डेपोच्या बसने राष्ट्रीय समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पवार हे प्रवास करीत असताना त्यांना भुसावळ बायपासवर उतरायचे होते. बसमध्ये बसताना कंडक्टरने त्यांना तेव्हा होकार दिला मात्र नंतर बस पुढे बायपासवर थांबणार नसल्याचे सांगितले. यावरुन समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पवार, वाहक व चालक यांच्यामध्ये वाद झाला आणि राष्ट्रीय पक्षाचे जिल्हाध्यक्षाला धक्काबुक्की केली. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे ब्रीदवाक्य असलेले जनतेच्या सेवेसाठी या वाक्याचा वाहन चालक व कंडक्टर यांना विसर पडला का अशी चर्चा प्रवाशांमध्ये होत असल्याचे दिसून आले.
खाली पहा या घटनेचा व्हिडीओ.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/555684515305115