भुसावळ संतोष शेलोडे । येथील परदेशी समाजबांधवांतर्फे महाशिवरात्री उत्सवाचे पर्व मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.
शहरात १९६५ पासून परदेशी समाजबांधव महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या चैतन्यदायी वातावरणात साजरा करत असतात. या परंपरेनुसार यंदादेखील यानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शिव मंदिरात सकाळी परिसरातील शिव भक्तगणांनी शिवाजीच्या मूर्तीची दुधाने अंघोळ करून पूजा अर्चा केली.नंतर होम करण्यात आला. दुपारी १२.०० वाजेच्या सुमारास होम झाल्यानंतर शिवजींची आरती झाली.भक्तगणांना प्रसाद वाटप करण्यात आला.तर मंदिराच्या शेजारी कढाई मध्ये बम बम भोले चा भंग मिश्रित दूध शिव भक्त प्रसादाच्या स्वरूपात वाटप करण्यासाठी तयार करीत होते.
सायंकाळी शनी मंदिर वार्डातुन बाल-गोपाळ,महिला,पुरुषांनी महादेवाच्या पिंडीचा देखावा करून मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक डेली मार्केट मधील तेली मंगल कार्यालया जवळील महाकालेश्वर मंदिरा मध्ये येऊन शिवजींची पूजा करून पुन्हा शनी मंदिर वार्डात गेली. त्यानंतर मंदिरामध्ये रात्रभर भजन करण्यात आले.या मंदिरात रोहित शर्मा यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. या कार्यक्रमात परदेशी समाजबांधव मोठ्या संख्येत सहभागी झाले होते.