भुसावळ प्रतिनिधी । शासकीय नियमांचे उल्लंघन करून सुरू असणार्या शहरातील दोन दुकानांना आज सील लावण्याची कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की, आज दि. १८ जून रोजी भुसावळ शहरातील जळगाव रोड वरील लक्ष्मी इंटर प्रायझेस, तसेच स्टेशनरोड वरील शिवाजी इंटरप्रयझेस दुकान सील करण्यात आले आहे. उप विभागीय अधिकारी रामसिंग सुलाने यांनी जारी केलेल्या आदेशांचे उल्लंघन केल्याने उप जिल्हाधिकारी तथा मुख्याधिकारी किरण सावंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या वेळी पंकज पन्हाळे, संजय बनाईते, सुरज नारखेडे, शेख परवेज अहमद, विशाल पाटील ,राजेश पाटील,पोलीस दीपक शिंदे यांनी ही कारवाई केली आहे.