भुसावळ प्रतिनिधी । आठवडे बाजारातील दोन दुकाने फोडून ५९ हजार रूपये किंमतीचे बेंटेक्सचे दागिने व १० हजार रूपयांचा कटलरी माल लंपास केल्याच्या घटना आज सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस आले. अवघ्या काही तासातच गुन्ह्यातील तीन संशयितांना भुसावळ बाजार पेठ पोलीसांनी अटक आली. तिघांविरोधात विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती, शहरातील आठवडे बाजारातील अप्सरा दुकान बिलाल शहा मुझ्झफर शहा (वय-३०) रा. गौसिया नगर भुसावळ यांच्या मालकीचे आहे. १९ जून रोजी सायंकाळी ७ वाजता त्यांनी दुकान बंद करून घरी निघून गेले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचा पत्रा उचकावून दुकानातील ५९ हजार रूपये किंमतीचे बेंटेक्सचे दागिने लंपास केले. तसेच त्यांचे दुकानाच्या मागच्या भागात असलेले गोडावूनमधून १० हजार रूपये किंमतीचे साडीचे लेस व लटकन असलेला माल चोरून नेले. याप्रकरणी एकाच व्यक्तीच्या फिर्यादीवरून भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक श्री दिलीप भागवत सो यांना मिळालेल्या खात्रीशीर बातमी वरुन संशयित आरोपी सोनू मोहन अवसरमल (वय-22) रा.वाल्मिक नगर भुसावळ, आकाश बाबुराव इंगळे (वय-28), रा.राहुल नगर भुसावळ, चेतन पुंजाजी कांडेलकर (वय-29) रा.पंचशील नगर भुसावळ यांना अटक करण्यात आले आहे. सदरची कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत याच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अनिल मोरे, पोना किशोर महाजन, रमण सुरळकर, रवींद्र बिऱ्हाडे, तुषार पाटील, महेश चौधरी, पो का विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, श्रीकृष्णा देशमुख, ईश्वर भालेराव, दिनेश कापनडे यांनी ही कारवाई केली आहे.