भुसावळ प्रतिनिधी । शहरातील बाजार परिसरातील दोन दुकानांना आज रात्री आग लागल्याचे वृत्त आहे. याबाबत वृत्त असे की शहरातील बाजार परिसरात कपडा मार्केट जवळील दोन दुकानांना रात्री भीषण आग लागली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते. भुसावळ येथील मुख्य बाजार पेठेतील पुजा टेलर व बाबा मेन्स वेअर्स या एका कापड दुकानाला रात्री साडेदहा चा सुमारास आग लागली . रात्री ९ नंतर मार्केट बंद झाल्यावर व्यापारी दुकाने बंद करून गेल्यावर पूजा टेलर या दुकानातून अचानक आगीचे लोळ बाहेर यायला लागले . इतर व्यापरांनी या बाबत तात्काळ अग्निशामक दलाला पाचारण केले. तसेच नगरसेवक पिंटू कोठारी यांनी आपले पाण्याचे टँकर आणुन आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.
अग्निशामक दल घटना स्थळी दाखल होवो स्तर आगीने रौद्र रूप धारण केले. या मधे 3 दुकाने जळून भस्मसात झाले. आगीचे कारण अद्याप समजू शकले नसून
आग. विझवण्यासाठी नगरपालिका व भुसावळ आयुध निर्माणी चा बंबाने शर्थीचे प्रयत्न केले. तसेच आग विझवण्यासाठी नगरसेवक पिंटू कोठारी व नगसेवक संतोष ( दाढी) चौधरी यांनी स्वतः घटना स्थळी येवून प्रयत्न केले. या आगीत सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नसून मात्र दुकानातील लाखो रुपयांच्या माल जळून खाक झाला आहे.
भुसावळात दुकानांना आग
6 years ago
No Comments