भुसावळ प्रतिनिधी । तेरापंथ महिला मंडळातर्फे भुसावळ शहरात महिलादिन उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून तेरापंथ महिला मंडळातर्फे आ. संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचा विशेष सन्मान व सत्कार करण्यात आला.
भारतीय स्त्रियाच भारतीय संस्कृतीचे जतन आणि संरक्षण करू शकतात, महिलांनी स्वतःला कधीच कमी लेखू नये.महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. महिलांनी जागरूक रहायला पाहिजे. निर्भया अत्याचाराच्या प्रकरणाला ७ वर्ष उलटत आहेत अजूनही प्रकरणात निर्भयाला न्याय मिळत नाही हे दुर्दैवी आहे. न्याय पद्धतीत कुठे तरी सरकारने बदल केला पाहिजे. महिलांनी सेल्फ डिफेन्स या विषयावर अभ्यास केला पाहिजे असे रजनी संजय सावकारे यांनी महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. प्रभा सुराणा, राजश्री चोरडिया यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी तेरापंथ महिला मंडळाच्या अध्यक्षा सरला छाजेड, मंत्री सरला निमाणी, सहमंत्री कविता कोठारी, कोषाध्यक्ष सुनीता छाजेड, कन्या मंडळ प्रभारी सपना छाजेड, ज्ञान शाला प्रभारी पूनम साखला, श्रद्धा चोरडिया महिला मंडळ, कन्या मंडळाच्या सदस्या उपस्थित होत्या. यावेळी शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली. यात महिलावर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.