Home धर्म-समाज भुसावळात तीन दिवसासाठी जनता कर्फ्यु : आमदार सावकारे

भुसावळात तीन दिवसासाठी जनता कर्फ्यु : आमदार सावकारे

0
29

 

भुसावळ, प्रतिनिधी । शहरात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भावात वाढ होत असल्याने रुग्णाची संख्या सहा झाली असून त्यातील दोन जण मयत झाले आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी भुसावळ शहरात तीन तीन दिवसासाठी जनता कर्फ्युचे पालन करावे असे आवाहन आ. संजय सावकारे यांनी केले आहे.

भुसावळ शहराची परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी आमदार संजय सावकारे यांनी व्यापाऱ्यांची चर्चा केली. या चर्चेदरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव शहारत वाढू नये यासाठी गुरुवार दि. ३० एप्रिल रोजी रात्री १२.०० वाजेपासून तीन दिवसासाठी जनता कर्फ्युचे पालन करण्याचे आवाहन आमदार सावकारे यांनी जनतेला केले आहे.


Protected Content

Play sound