भुसावळ प्रतिनिधी । जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी येथील नगरपालिका शाळा क्रमांक १ च्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त बालकांचे लैंगिक अत्याचारासंदर्भात पॉक्सो कायदा मार्गदर्शन, किशोरवयीन मुलींना समुपदेशन महिला व मुलींसाठी आयोजित करण्यात आले आहे.
महिलांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केले जाणार असून या कार्यक्रमात महिला लाभार्थीसाठी मुद्रा लोन योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अंतर्गत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गटप्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना तसेच कौशल्य विकास व उद्योजकता विभागांतर्गत रोजगार नोंदणी या योजनांची माहिती देण्यात येणार आहे.
परिसरातील आजी माजी सैनिक माता, पत्नी, शेतकरी, कामगार, डॉक्टर, इंजिनीअर, शिक्षक, जेष्ठ महिलांचा व होतकरू व कर्तृत्ववान महिलांसोबत सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, सांस्कृतिक यासह विविध क्षेत्रात महिला सशक्तीकरण व सबलीकरण यासाठी काम करून नावलौकिक मिळविलेल्या महिलांना, आजी माजी सैनिक पत्नी, तसेच वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेल्या महिलांना गौरवण्यात येणार आहे. परिसरातील महिलांनी उपक्रमात सहभागी नोंदवावा असे आयोजन समितीतर्फे आवाहन करण्यात आले आहे.