भुसावळ प्रतिनिधी । प्रशासन प्रयत्नांची पराकाष्ठा करत असले तरी शहरात आज पुन्हा नव्याने १४ बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यामुळे नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन करण्याची आवश्यकता अधोरेखीत झाली आहे.
भुसावळ शहरात प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांनी मध्यंतरी कोरोना बाधीतांच्या संख्येमध्ये थोडी घट आली होती. मध्यंतरी थोडे फार रूग्ण आढळून आले होते. तथापि, आज एकाच दिवशी तब्बल १४ कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्याने यंत्रणांसमोरील अडचणी वाढल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आता करण्यात येत आहे.