भुसावळ (प्रतिनिधी) महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अध्यक्षपदाच्या वादासह पूर्व वैमनस्याच्या कारणावरून शहरातील अशोक नगर भागातील किरण खरात यांच्यावर सात जणांनी चाकू हल्ला केल्याची घटना शुक्रवार २८ रोजी दुपारी घडली होती. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या हल्ल्यात खरात हे गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत किरण अशोक खरात शुक्रवारी दुपारी घराजवळ असताना संशयीत आरोपी सुभाष उर्फ विठ्ठल श्रीराम मोरे, ऋषिकेश सुभाष मोरे, संदीप भीमराव खंडारे, धीरज वसंत खंडारे, विजय शेषराव भालेराव अजय विजय भालेराव, गोल्या उर्फ अक्षय भीमराव खंडारे यांनी डॉ.आंबेडकर उत्सव समितीच्या अध्यक्षपदावरून व पूर्व वैमनस्यातून वाद करीत त्यांचेवर चाकूने हल्ला केला. त्यात किरण खरात गंभीर जखमी झाले. या संदर्भात बाजारपेठ पोलिस ठाण्यात किरण अशोक खरात (३२, रा.अशोक नगर भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरनं. ६९/२०२०, भादंवि कलम ३०७ १४३, १४८, ५०६ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.