Home धर्म-समाज भुसावळातील स्मशानभूमीत काम करणाऱ्यास मानधन द्या- प्रांतांना निवेदन

भुसावळातील स्मशानभूमीत काम करणाऱ्यास मानधन द्या- प्रांतांना निवेदन


भुसावळ प्रतिनिधी । शहरातील स्मशानभूमीत गेल्या १५ वर्षांपासून अंत्यसंस्काराचे काम पाहणारे अरूण रणधीर यांना मानधन मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भुसावळ येथील स्मशान भुमीत गेल्या १५ वर्षापासुन प्रेतांची अंतिमसंस्कार करणारे अरूण उत्तम रणधीर रा. स्मशानभुमी भुसावळ हे निशुल्क सेवा करीत आहे. त्यांना एकुण ११ मुले व एक पत्नी असा मोठा परिवार आहे. भुसावळ नगरपरिषदेने गेल्या १५ वर्षापासुन आज तागायत कोणताही मोबदला दिलेला नाही. तरी त्यांच्या परिवाराला दरमहा ३० हजार रूपये पगार देण्यात यावा. अंतिम संस्काराच्या कार्यात देखरेख करीता त्यांची मुले व त्यांचा परिवार निस्वार्थ काम करीत आहे. तरी अरूण रणधीर यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आलेली आहे.

तरी भुसावळ नगर परिषदेने त्यांना 30 हजार रूपये दरमहा पगार देण्यात यावा. अरूण उत्तम रणधिर यांच्या मोठ्या मुलाला भुसावळ नगर पालिकेत नोकरी देण्यात यावी अन्यथा लोकशाहीच्या मार्गाने नगरपालिकेवर आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे देण्यात आला आहे.


Protected Content

Play sound