Home धर्म-समाज भुसावळातील वाल्मिक नगरात जीवनावश्यक वस्तुंचे वाटप

भुसावळातील वाल्मिक नगरात जीवनावश्यक वस्तुंचे वाटप


भुसावळ प्रतिनिधी । भारतरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व मातोश्री रमाई आंबेडकर यांच्‍या लग्‍नाच्‍या वाढदिवसानिमित्त शहरातील वाल्मिक नगर परीसरात गरजूंना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रमाई आंबेडकर यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी जामनेर रस्‍त्‍यावरील वाल्‍मिक नगर, रमाई आंबेडकर नगर प्रभाग क्र.९ मधील नगरसेविका सोनी संतोष बारसे, माजी नगरसेवक संतोष बारसे, नगरसेवक अॅड. बोधराज चौधरी, समाजसेवक गब्बर चावरिया व पहेलवान पुत्र गुपतर्फे जिवनिवश्‍यक वस्‍तुंचे वाटप गोर गरीब गरजु कुटूंबांना वाटप करण्‍यात आले.


Protected Content

Play sound