Home आरोग्य भुसावळातील रेल्वे कोविड रूग्णालयातून पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली सुट्टी (व्हिडीओ)

भुसावळातील रेल्वे कोविड रूग्णालयातून पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली सुट्टी (व्हिडीओ)


भुसावळ प्रतिनिधी । कोरोनाच्या पाश्वभुमीवर जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र लढणाऱ्या फैजपूर व सावदा येथील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना भुसावळ येथील रेल्वे कोविड रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांचा अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. सहकारी पोलीसांनी व नागरीकांनी त्यांच्यावर फुलांची उधळण करीत त्यांचे स्वागत केले.

कोरोनाशी यशस्वीपणे लढा देऊन कर्मचारी सुखरूप घरी परत येत आहेत. अजुनही कोरोनाचा लढा संपलेला नाही .सर्वानी काळजी घेणे गरजेचे आहे .कर्मचाऱ्यांनी स्वताची व परीवाराची काळजी घ्यावी, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांनी केले आहे. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, तालुका पोलीस निरीक्षक रामचंद्र कुंभार यांच्यासह सहकारी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

https://www.facebook.com/watch/?v=2807523529534162


Protected Content

Play sound