Home धर्म-समाज भुसावळातील बियाणी स्कूलमध्ये शिवजयंती उल्लोषात साजरी

भुसावळातील बियाणी स्कूलमध्ये शिवजयंती उल्लोषात साजरी


biyanischool

भुसावळ प्रतिनिधी । राष्ट्रीय शिक्षा समिती संचलित बियाणी स्कूलमध्ये शिवजयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस मनोज बियाणी यांनी माल्यार्पण केले.

शिवाजी महाराजांच्या कुशल राज्यकारभार विषयी विदयार्थ्याना मार्गदर्शन केले. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये शिवाजी महाराजांचा जल्लोष दिसून येत होता आणि उत्साहात घोषणा देत मार्गक्रमण करत होते. तसेच लेझीम पथक लक्ष वेधून घेत होते. शिवाजी महाराजांच्या जीवनपटावरील प्रसंग व पोवाड्यातून हुबेहूब सजीव देखावा सादर केला. यावेळी मनोज बियाणी, संगीता बियाणी, राजू पारीख, प्रवीण भराडीया, गोपाळ ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीमध्ये सहभागी झालेले ताप्ती पब्लिक स्कूलच्या विदयार्थ्यानी छत्रपती शिवाजी महाराजांचे मंत्रिमंडळ असा सुंदर सजीव देखावा सादर केला.त्यात विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी लेझीम पथक मध्ये सहभाग नोंदवला तसेच वेशभूषा स्पर्धेत सहभाग घेतला आणि विजेते ठरले.


Protected Content

Play sound