भुसावळ , प्रतिनिधी । भुसावळचा मृत्यूदर आणि कोरोना रुग्णांची संख्या ही अतिशय भयावह आहे. भुसावळ शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.मात्र, नियमितस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने ठोस अशी उपाययोजना करण्यात अडचणी येत असल्याने भुसावळ न.पा. ला नियमीतस्वरूपी मुख्याधिकारी द्यावा अशी मागणी शिशिर जावळे यांची मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
भुसावळचा मृत्यूदर आणि कोरोना रुग्णांची संख्या ही अतिशय भयावह आहे. भुसावळ शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आणि अशातच सातत्याने चर्चेत असलेल्या भुसावळ नगरपालिकेमध्ये आज पावेतो. भुसावळ शहराला एकही सक्षम कर्तव्य दक्ष मुख्याधिकारी कायम लाभलेले नाहीत व टिकले नाहीत. कोरोनाच्या संक्रमणाच्या संकट काळामध्ये भुसावळ शहराची स्थिती बिकट असताना. तत्कालीन मुख्याधिकारी करुणा डहाळे त्यांच्याविषयी अनेक तक्रारी होत्या. तसेच त्या भुसावळ शहरात वेगाने फैलाव होणाऱ्या कोरोना विषाणूच्या संक्रमणाला रोखण्यासाठी तसेच जनतेच्या मूलभूतसमस्या सोडवण्यामध्ये त्या पूर्णपणे अपयशी ठरल्यामुळे त्यांना तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी सक्तीच्या रजेवर पाठविले होते. त्यांच्या जागेवर प्रभारी म्हणून काही दिवसांपूर्वी उपजिल्हाधिकारी किरण सावंत पाटील यांनी तो पदभार स्वीकारला होता. किरण पाटलांच्या काळात पालिकेच्या पथकांनी बाजारात व्यापक कारवाई करून गर्दी कमी केली होती. त्यामुळे बाजारात बर्यापैकी फिजिकल डिस्टन्सिंग शिस्त लागली होती. परंतु, ते सुद्धा रजेवर गेल्यामुळे चोपड्याच्या नगरपालिकेचे मुख्याधिकारी अविनाश गांगुर्डे यांच्याकडे आता सध्या भुसावळ नगरपालिका मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आलेला आहे. हे मुख्याधिकारी फक्त आठवड्यातून दोन दिवस भुसावळ शहराला देणार आहेत. त्यामुळे जर अशीच पद्धत चालू राहिली तर कायमस्वरूपी मुख्याधिकारी भुसावळ शहराला मिळाला नाही. आधीच अविकसित असणाऱ्या व कोरोना विषाणू च्या विळख्यात असणाऱ्या भुसावळ शहरातील नियोजन १००% ढासळेल. तसेच येणाऱ्या पावसाळ्यात होणारे साथीचे आजार, नालेसफाई, रस्त्यांच्या समस्या, स्वच्छतेच्या समस्या वगैरे मूलभूत समस्या आधीपेक्षा शंभर पटीने जास्त प्रमाणात उद्भवतील. यामुळे भुसावळकरांची चिंता अजून वाढू शकते. हे अतिशय भयावह असेल. भुसावळकर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे अतिशय घातक ठरू शकते. म्हणून भुसावळ शहराला शहराच्या विकासासाठी, कोरोना विषाणूच्या प्रतिकूल परिस्थितीला योग्यरीत्या नियोजनबद्ध सांभाळून भुसावळ नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण होण्यासाठी भुसावळकरांना भय मुक्त करण्यासाठी, बहुत असताना त्यांच्या मूलभूत सुविधा मिळण्यासाठी, तसेच भुसावळ शहराच्या मूलभूत सुविधांचे आदर्श नियोजन करण्यासाठी, भुसावळ नगरपरिषदेला कायमस्वरूपी मुख्यअधिकारी नेमावा अशी मागणी प्रधानमंत्री जनकल्याण योजना प्रचार व प्रसार अभियानाचे जळगाव जिल्हाध्यक्ष शिशिर जावळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व जळगाव जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.