भुसावळ : प्रतिनिधी । उत्तर भारतातील धार्मिक स्थळांची यात्रा पूर्ण करून परतीच्या प्रवासात नियोजित रेल्वेगाडी हुकल्यामुळे भुसावळात अडकून पडलेल्या अकोला जिल्ह्यातील यात्रेकरूंना जि प सदस्य रवींद्र पाटील यांनी केलेली मदत लाख मोलाची ठरली
वरुर जऊळका ( ता अकोट , जिल्हा अकोला) येथील योग योगेश्वर संस्थानच्या माध्यमातून ह भ प गणेश महाराज शेटे यांच्यासोबत विदर्भातुन शासनाच्या अटीचे पालन करून 150 यात्रेकरू काशी विश्वनाथ, अयोध्या, प्रयागराज तिर्थयात्रेला गेले होते परतीच्या प्रवासात शनिवारी ताप्ती गंगा रेल्वे गाडी 4 तास लेट झाली त्यामुळे त्यांची नंतरची भुसावळ ते अकोला गाडी निघून गेली .
भुसावळात उतरल्यावर या यात्रेकरूंची मोठी तारांबळ उडाली रेल्वेकाउंटरवर विनंती केली पण कोणी ऐकण्यास तयार नव्हते अशावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांना या यात्रेकरूंनी फोन लावला आ . मिटकरी यांचे सहकारी व जळगाव राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील यांनी आ . मिटकरी यांची सूचना मिळाल्यावर कार्यकर्त्यांसमवेत रेल्वे स्टेशनवर प्रयत्न करून त्यांना आधीच्याच तिकिटावर स्टेशन मास्तरची सही घेऊन पुढील रेल्वेमध्ये काही जणांना प्रवेश मिळवून दिला रेल्वेने अकोल्याकडे जाणाऱ्या या यात्रेकरूंना अकोला पर्यंत अडचण येउ नये त्यांच्यासोबत सहकारी योगेश नरोटे यांना पाठवले.
त्यानंतर उर्वरित यात्रेकरूंसाठी लॉकडाऊन असला तरी दोन एसटी बसेस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना वस्तुस्थिती सांगत विनंती करून रविंद्र नाना पाटील यांनी उपलब्ध करून दिल्या या दुरून आलेल्या सर्व यात्रेकरूंची भोजनाचीही व्यवस्था केल्यामुळे सर्व यात्रेकरू समाधान व्यक्त करीत होते या सर्व धावपळीत रवींद्र पाटील यांना योगेश नरोटे, अमोल मांडे, धवल पाटील, शुभम मराठे, भूषण पवार, राहुल वाघ, चद्रकांत मराठे या सहकाऱ्यांनी सहकार्य केले .