Home धर्म-समाज भुसावळच्या पंचशील नगरात गाजावाजा न करता साध्या पद्धतीने विवाह

भुसावळच्या पंचशील नगरात गाजावाजा न करता साध्या पद्धतीने विवाह

0
25

 

भुसावळ, प्रतिनिधी । शहरातील पंचशील नगर येथे दिपक मगरे यांच्या मुलीचा विवाह कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही गाजावाजा न करता साध्या पद्धतीने संपन्न झाला.

दिपक मगरे यांची कन्या नेहा व साकरी येथील रामू मेघे यांचे चिरंजीव सचिन यांचा तीन महिन्यांपूर्वी साखरपुडा झाला होता. यावेळी त्यांचा विवाह ३० एप्रिल रोजी ठरला होता. मात्र, भुसावळ शहरात वाढत्या कोरोनाग्रस्तांची संख्या बघता त्यांनी हा विविह साध्या पद्धतीने कोणताही गाजावाजा न करता सोशल डिस्टेनसिंगचा वापर करत केवळ ५ लोकांमध्ये पार पडला. याप्रसंगी ए. टी. सुरळकर व युवराज नरवाडे यांनी बौद्ध पद्धतीने विवाह लावला. मगरे व मेघे कुटुंबीयांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.


Protected Content

Play sound