यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील डांभुर्णी येथील भुषण चौधरी हे महाराष्ट्र लोकसेवा स्वयंदीप प्रतिष्ठानचे परिक्षेतुन नवी मुंबईच्या नगररचना उपायुक्तपदी नियुक्त करण्यात आली आहे.
डांभुणी तालुका यावल येथील प्रगतीशील शेतकरी रामचंद्र विष्णू चौधरी यांचे सुपुत्र भूषण रामचंद्र चौधरी यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून उपायुक्त नगर रचनाकार (वर्ग-1) महाराष्ट्र शासन पदी यशस्वी निवड झाली आहे. डांभुर्णी तालुका यावल या गावात ग्रामस्थांमध्ये आंनदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भूषण चौधरी आपल्या या यशामुळे आपल्या गावातील, परिसरातील आणि तालुक्यातील नवयुवक प्रेरणा घेतील तसेच आपल्या निवडीमुळे प्रशासकीय सेवांमध्ये करिअर करू पाहणाऱ्या तरुणांसाठी एक पोषक वातावरण निर्माण होईल.
भूषण चौधरी यांचे माध्यमिक शिक्षण भगीरथ विद्यालय जळगाव त्यानंतर जुनिअर कॉलेज मुलजी जेठा महाविद्यालय जळगाव आणि 2001साली (BE-Civil) विशेष प्राविण्यासह पूर्ण केलं आणि 2003 साली (ME-Town and Country planning) हे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे (COEP) येथून विशेष प्राविण्यासह पदविका पूर्ण केली.
त्यानंतर स्वतःच शेअर ट्रेडिंग च फर्म भूषण दादांनी सुरू केलं पुढे जाऊन 2008 मध्ये त्यांची व त्यांच्या सुविद्य पत्नी दोघांची एकाच दिवशी महाराष्ट्र शासनाच्या सिडको विभागात उपनियोजनकार पदी निवड झाली. नवी मुंबई पक्रल्प, नैना, विकास योजना,विकास आराखडा आणि नगररचना योजना इत्यादीं प्रकल्पांचा पंधरा वर्षाचा दांडगा अनुभव भूषण यांच्याकडे आहे. सध्या सिडकोमध्ये सहयोगी नियोजनकार तथा अतिरिक्त नगरचना अधिकारी या पदाचा कार्यभार सांभाळत आहे.