जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील लक्ष्मीनगर भागात घरासमोर बांधलेल्या 15 हजार रुपये किमतीच्या तीन बकऱ्या चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरुवार , २ फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव शहरातील लक्ष्मी नगरात सागर किसन सातव वय ३३ हे राहतात. ते कापड व्यावसायिक आहे. सातव यांनी गुरुवारी नेहमीप्रमाणे त्यांच्या घरासमोर त्यांच्याकडे असलेल्या तीन बकऱ्या बांधल्या होत्या. दुपारी तीन वाजता तिन्ही बकऱ्या दिसून आल्या नाही , सर्वत्र परिसरात शोध घेतला असता, बकऱ्या मिळून आल्या नाहीत. त्यांनतर त्यांनी रात्री नऊ वाजता त्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास योगेश पाटील करीत आहेत.