भीषण अपघात : भरधाव कंटेनरने हॉटेलातील १२ जणांना चिरडले !

धुळे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । बुलढाणा जिल्ह्यातील अपघाताची घटना ताजी असतांना धुळे जिल्ह्यात मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. भरधाव कंटेनर थेट हॉटेलात घुसल्याने १२ जणांना चिरडल्याने थरारक घटना समोर आली आहे. या अपघात हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान, ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाल्याचे समोर आले आहे.

 

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील पाळासनेर गावाजवळ मंगळवारी दुपारी १२ वाजता घडला आहे. भरधाव कंटेनरचे ब्रेक फेल झाल्यामुळे आधी दोन वाहनांना उडविले. त्यानंतर थेट कंटेनर मार्गावर असलेल्य हॉटेलात घुसल्याने येथील १२ जणांन चिरडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. तर इतर काही जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना नजीकच्या इस्पितळात दाखल करण्याचे काम सुरू आहे. अपघाातात अजून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या घटनेने महामार्गावर एकच हाहाःकार उडाला. अपघाताची घटना घडताच स्थानिक लोक मदतीला धावून आले आणि लोकांना बाहेर काढण्यास सुरवात केली. घटनेची माहिती मिळताच हद्दीतील पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून मयतांचे ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

Protected Content