चोपडा लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बऱ्हाणपूर- अकंलेश्वर महामार्गावर अडावद येथून जवळच असलेल्या गवळी नाल्या जवळ ट्रक व दुध गंगा पिकअप बोलेरोचा भिषण अपघात झाला. काल दि. २२ च्या मध्यरात्री नंतर १ वाजेच्या सुमारास घडलेल्या या हृदयद्रावक घटनेत २ जण ठार झाले आहेत. तर ३ जण गंभीर जखमी झाले आहे.
या दुदैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातात पिकअप बोलेरोचा चक्काचुर झाला असून ट्रकही क्षतिग्रस्त झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपड्याकडुन अडावदकडे येत असलेल्या ट्रक क्र. जी.जे.१२ बी.टी.९३९७ व जळगावहुन चोपड्याकडे जात असलेल्या दुध डेअरीची पिकअप बोलेरो क्र. एम.एच.१९ सी.वाय. ५६७४ यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाल्याने पिकअप बोलेरोमधील २ जण जागीच ठार झाले तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेतील मृतात चोपडा येथील प्राथमिक शिक्षक नितीन दामू मोरे (वय ४५) व गणेश काशिनाथ देशमुख(वय ३२) यांचा समावेश आहे. तर गुड्डू अरुण देशमुख (३०), बाबा पांडूरंग देशमुख (३२), चुनिलाल खुशाल देशमुख (३१) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच अडावद पोलीस ठाण्याचे किरण दांडगे, पोउनि जगदिश कोंळबे, शरिफ तडवी, मुकेश तडवी, नासिर तडवी आदींनी घटनास्थळी धाव घेतली.