मुंबई (वृत्तसंस्था) भीमा कोरेगाव प्रकरणतील संशयित वरवरा राव आणि शोमा सेन यांचा अंतरिम जामीन विशेष एनआयए कोर्टाने आज नाकारला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर दोघांनी अंतरिम जामीन मागितला होता. मात्र, त्यांना हा जामीन नाकारण्यात आला आहे.
पुणे येथील ३१ डिसेंबर २०१७ रोजी शनिवारवाड्यात आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेत चिथावणीखोर भाषणे देण्यात आली. तसेच या परिषदेसाठी माओवादी संघटनेने निधी पुरविल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या चिथावणीखोर भाषणांमुळेच १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा येथे जातीय दंगल उसळली, असे पोलिसांनी या सहा जणांवर दाखल केलेल्या दोषारोपपत्रात म्हटले आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे जामीन मिळावा, अशी विनंती वरवरा राव आणि शोमा सेन यांनी एनआयए कोर्टाकडे केली होती. परंतू न्यायालयाने विनंती फेटाळत जामीन नाकारला आहे.