पुणे (वृत्तसंस्था) भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची साक्ष नोंदविण्याचा मोठा निर्णय चौकशी आयोगाने घेतला आहे. चौकशी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांनी हा निर्णय घेतलाय.
शरद पवार यांची साक्ष पुण्यात पुढील महिन्यात मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे. मोठा काळ ही सुनावणी चालेल. याच दरम्यान शरद पवार यांना साक्षीसाठी बोलावण्यात येणार आहे. यासाठी आगामी काही दिवसांमध्येच आयोगाकडून शरद पवार यांना साक्षीबाबत समन्स पाठवण्यात येणार आहे. दरम्यान, शरद पवारांनी अनेकदा माध्यमांसमोर भीमा कारेगाव प्रकरणात आपल्याकडे महत्त्वाची माहिती असल्याचं सांगितलं होतं. तसेच अनेक गंभीर आरोपही केले होते. त्यामुळे आयोगाने त्यांची साक्ष नोंदविण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.