जळगाव प्रतिनिधी । देशात सर्व क्षेत्रांचे खासगीकरण होत असून यामुळे बहुजनांच्या रोजगारावर गदा येत असल्याचा आरोप करत आज येथे भीम आर्मीतर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली. यासंदर्भात निवेदन देण्यासाठी गेलेल्या आंदोलकांना जिल्हाधिकारी यांनी भेट न घेतल्याचे टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घोषणाबाजी केली.
दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सरकारी क्षेत्रात खासगीकरण होत असल्याने एसी. एसटी, ओबीस आणि अल्पसंख्याक समूदायाच्या तरूणांवर बेरोजगाराची गदा आणली जात आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयात खासगीकरून करू नये असे म्हटले आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येवून निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कामा निमित्त निवेदन स्विय सहाय्यकास देण्याचे निर्देश दिले. भिम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांची भेट न घेतल्याने पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आवारात घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, जिल्हा पेठ पोलीसांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेवून आंदोलकांना ताब्यात घेतले.
यावेळी निवेदनावर भिम आर्मी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे, महासचिव श्रीकांत वानखेडे, मुख्य संघटक विक्रम प्रधान, सचिव सुपडू संदाशिंव, विजय मालविय, किशोर जोगदंडे, हेमराज तायडे, शिवाजी गजरे, निखिल साबळे, गोलू तायडे, शंकर लहासे, राजू इंगळे, आश्विन इंगळे, विशाल कांबळे, प्रदिप वानखेडे, मल्हार खैरनार, विजय सोनवणे आदी उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/725920424655613