भालोदचे नवनिर्वाचित सरपंच प्रदीप कोळी यांचा शास्त्री यांच्या हस्ते सत्कार

 

यावल :  प्रतिनीधी ।  तालुक्यातील भालोद येथील नवनियुक्त सरपंच  प्रदीप  कोळी यांचा बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार स्वामीनारायण गुरुकुलचे   शास्त्री भक्ती किशोर दास यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला

 

स्वामीनारायण सत्संग समाज यांच्यातर्फे सुधीर चौधरी यांनीही  प्रदीप  कोळी यांचा सत्कार केला या छोटेखानी कार्यक्रमात आशीर्वाद देताना शास्त्री यांनी गावाची सेवा व समान विकास करण्याचे आवाहन केले आणि मदतीचे आश्वासन दिले

 

यावेळी दीपक कोळी, सुधाकर कोळी, सुनील कोळी, वसंत कोळी, अरुण कोळी, प्रल्हाद कोळी, अरविंद पिंगळे, चंद्रकांत इंगळे,  सुपडू चौधरी, सुधिर चौधरी, रमेश नेहते, चमचम चौधरी, सोपान बानाईत , प्रमिला कोळी, ललिता कोळी, अनिता कोळी, हेमांगी कोळी, माधुरी कोळी, चमेलीबाई कोळी, सिंधू चौधरी, सुनिता चौधरी, शशिकला चौधरी, जयश्री चौधरी व ग्रामस्थ मोठया संख्येत उपस्थित होते.

Protected Content