फैजपूर प्रतिनिधी । भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा बालपणापासून आपल्या मनामनावर बिंबलेली आहे. समाजाची सद्यस्थिती पाहता प्रत्येकाने एकोपा, बंधुता आणि सहकार्य वाढीस लागण्यासाठी प्रयत्न करावा. भारत भूमी शूर- वीरांची भूमी असून अवघ्या विश्वा समोर आदर्श राष्ट्र आहे. या राष्ट्राची प्रतिमा अधिक उंचावण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करूया, असे आवाहन ध.ना.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी.आर.चौधरी यांनी केले. ते प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने आयोजित ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या प्रांगणात कै लोकसेवक मधुकरराव चौधरी औषधनिर्माण महाविद्यालय, औषधनिर्माण पदविका महाविद्यालय, शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालय व चेतना इंग्लिश स्कूल चे सर्व शाखा इत्यादी शाखांचे सर्व सन्माननीय प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स व इतर विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी ध्वजारोहण आधी राज्यघटनेच्या सरनामाचे जाहीर वाचन करण्यात आले.
यासोबत संविधानाचा आदर राखून सारनाम्यातील अधोरेखित संकल्पना आपल्या आयुष्यात अवलंबण्याचा निर्धार केला गेला. यावेळी एनएसएस, एनसीसी, क्रीडा व इतर माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन केले अशाचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तापी परिसर विद्या मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सण व उत्सव समितीचे चेअरमन प्रा.डॉ.आय.पी.ठाकूर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.शरद बिऱ्हाडे, प्रा.डॉ.रवी केसुर, प्रा.डॉ सरला तडवी, एनसीसी अधिकारी प्राध्यापक लेफ्ट राजेंद्र राजपूत, नितीन सपकाळे, विलास चौधरी, संतोष तायडे, शेखर महाजन, चेतन इंगळे, नारायण जोगी, कैलास चंदनशिव, पराग राणे, यांनी परिश्रम घेतले.