जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने सोमवार १५ मे रोजी सकाळी ११ वाजता बेरोजगार जोडो यात्राचे आयोजन करण्यात आले होते. ही यात्रा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान काढण्यात आली. तर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्वतंत्र भारतात बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे, सहकारी क्षेत्रात लोकसंख्येनुसार रोजगार उपलब्ध होत नाही, भारतात किमान ४० कोटी तरुण बेरोजगारांच्या हाताला काम नाही, प्रति दिवस बेरोजगारांच्या कारणास्तव देशात दिवसाला ३८ सुशिक्षित बेरोजगार आत्महत्येचा मार्ग अवलंबित आहे. वाढत्या बेरोजगारीमुळे तरुणांना हिंसा, अपरात, हत्या, लूट यामध्ये अडकविले जात आहे. त्यामुळे भारतातील समस्यांमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यामुळे दहावी ते पदवी झालेल्या तरुण तरुणींना त्यांच्या योग्यतेनुसार ५ वर्षाच्या आत रोजगार उपलब्ध करून द्यावे, जोपर्यंत रोजगार उपलब्ध होत नाही तोपर्यंत केंद्र व राज्य सरकार बेरोजगारी भत्ता देण्यात यावा, प्रत्येक सहकार्य क्षेत्रात लोकसंख्येच्या नुसार रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा, रिक्त असलेले पद लवकरात लवकर भरण्यात यावे, बेरोजगार तरुणांना तात्काळ रोजगार देऊन नियुक्तपत्र देण्यात यावे, सरकारी रोजगार भरतीचे १०० रुपये पेक्षा जास्त आकरून नये यासह इतर प्रलंबित विविध मागण्यांसाठी बेरोजगार जोडो यात्रा काढण्यात आले.
याप्रसंगी बहुजन क्रांती मोर्चाचे राज्य सहसंयोजक सुमित्र अहिरे. भारतीय बेरोजगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष देवानंद निकम, बहुजन मुक्त पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजू खरे, बहुजन क्रांती मोर्चाचे शहर संयोजक सुनील देहेडे, भीम आर्मीचे शहराध्यक्ष चंद्रमणी मोरे, प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष निलेश बोरा, भारत मुक्ती मोर्चाचे राहुल पाटील, खुशाल सोनवणे, इमरान शेख, अमजद रंगरेज, विनोद अडकमोल, पंकज तायडे, संतोष पावरा, सेवाराम पावरा, ऋषिकेश सुरवाडे, प्रथमेश महाले यांच्यासह आदी उपस्थित होते.