Home धर्म-समाज भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्ष चौधरी तर उपाध्यक्षपदी तडवी

भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्ष चौधरी तर उपाध्यक्षपदी तडवी


यावल प्रतिनिधी । शहरातील भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी ए.टी. चौधरी यांची तर फिरोज तडवी यांची निवड आज संपन्न झालेल्या बैठकीत करण्यात आली करण्यात आहे.

यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाची बैठक संस्थापक अध्यक्ष अय्युब पटेल यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र प्रदेश सविव जिवन चौधरी, प्रदेश संघटक सुनिल गावडे यांच्यासह सुनिल पिंजारी, शब्बीर खान, बाळासाहेब आढाळे, चंद्रकांत सोनवणे, सुधाकर धनगर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज १३ जानेवारी २०२१ रोजी ११ वाजता पत्रकार संघाची बैठक संपन्न झाली. बैठकीत पत्रकारांच्या विविध समस्या व अडचणींच्या विषया संदर्भात यात यावल तालुका नुतन कार्यकारणीची निवड करण्यात आली असून तालुकाध्यक्षपदी ए.टी. चौधरी यांची तर उपाध्यक्षपदी फिरोज तडवी यांची व तालुका संघटकपदी विक्की वानखेडे, सहसंघटकपदी दिपक नेवे यांची निवड करण्यात आली आहे . संघाच्या नुतन पदधिकारी यांचे स्वागत करण्यात आले.


Protected Content

Play sound