भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयका विरोधात मुख्यमंत्र्यांना १० लाख पत्र

अमळनेर प्रतिनिधी | विद्यार्थ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करणारे विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक (काळे विधेयक) महविकास आघाडी सरकारने मुद्दाम घाई घाईने पारित करून घेतला असल्याचा आरोप भारतीय जनता युवा मोर्चा करत या कायद्या विरोधात मुख्यमंत्र्यांना अमळनेरातून २००० तर राज्यातून १० लाख पत्र पाठविण्यात आले आहेत.

 

भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने  विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयकाच्या माध्यमातून प्र.कुलपती हे नवीन पद तयार करून सन्मानिय कुलपतींचे अधिकार उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांना दिले जाणार आहेत. विद्यापीठांना राजकारणाचा अड्डा बनविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. भविष्यात कुलगुरूंच्या नियुक्त्या ,विद्यार्थ्यांच्या पदव्या या सगळ्यातच आरोग्य सेवक भरती परीक्षा ,म्हाडा परीक्षा प्रमाणे करोडोंच्या भ्रष्टाचाराचे विषय करण्यासाठी यांना हे प्र.कुलपती पद पाहिजे का? हा प्रश्न विद्यार्थी विचारात आहेत. या काळया विधेयकाला विरोध करत विद्यार्थी बांधवांना सोबत घेऊन भाजयुमो महाराष्ट्राचे अध्यक्ष विक्रंत पाटील यांच्या मार्गदर्शनात राज्यातून १० लाख पत्र भारतीय जनता युवा मोर्चाने पाठवले. तर अमळनेरमधून भाजयुमो प्रदेश सचिव भैरवी वाघ पलांडे यांच्या नेतृत्वात अमळनेर भाजयुमोतर्फे मुख्यमंत्र्यांना २००० पत्र पाठवण्यात आले. तसेच ज्यांचा या काळया कायद्याला विरोध आहे त्यांनी 7745050111 या क्रमांकावर मिस् कॉल द्यावा असेही आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले आहे. यावेळी भाजपा भटक्या विमुक्त आघाडी युवक जिल्हाध्यक्ष देवा लांडगे,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शिवाजी राजपूत शहर अध्यक्ष पंकज भोई, विलास सुर्यवंशी, राहुल चौधरी, समाधान पाटील, हिरालाल पाटील, योगीराज चव्हाण, महेश पाटील, स्वप्नील पाटील, किरण बडगुजर, तुषार पाटील, किरण बोरसे, राजगुरू महाजन,गौरव सोनार,सुमित हिंदुजा,सौरभ पाटील,कपिल कापांडे,सागर बारी,गौरव महाजन व इतर युवा मोर्चा पदाधिकारी, विद्यार्थी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content