Home राजकीय भारतीय जनता पार्टी सावदा शहराध्यक्षपदी जे.के. भारंबे यांची निवड

भारतीय जनता पार्टी सावदा शहराध्यक्षपदी जे.के. भारंबे यांची निवड

0
36

सावदा, प्रतिनिधी | भारतीय जनता पार्टीच्या सावदा शहराध्यक्षपदी जे. के. भारंबे यांची निवड रावेर येथे  भाजपा कोअर कमिटीच्या बैठकीत जाहीर करण्यात आली.

 

रावेर भाजपा कार्यालयात आयोजित कोअर कमिटीच्या बैठकीत सावदा शहर अध्यक्षपदासाठी जे.के भारंबे यांच्या नवाची निवड करण्यात आली. त्यांना नियुक्ती पत्र जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, शिवाजीराव पाटील, तालुका अध्यक्ष राजन लासुरकर यांच्या हस्ते देण्यात आले. निवडीनंतर जिल्ह्याचे नेते माजी मंत्री आ. गिरीश महाजन,भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष आ.राजूमामा भोळे, रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे, जिल्हा परिषद अध्यक्षा ना. रंजना पाटील, भाजपा किसान मोर्चाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख सुरेश धनके, जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, प्रल्हाद पाटील यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन,मा.संगायोचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील,तालुका अध्यक्ष राजन लासुरकर, तालुका सरचिटणीस महेश चौधरी, सी.एस.पाटीलसर, माजी सावदा शहराध्यक्ष पराग पाटील,बेटी बचाव बेटी पढावच्या जिल्हा संयोजिका सारिका चव्हाण यासह कार्यकर्त्यांनी रावेर कार्यालय येथे त्यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Protected Content

Play sound