मुक्ताईनगर प्रतिनिधी । पूजा चव्हाण यांच्या संशयास्पद मृत्यूचे चौकशी व्हावी व वन मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा असे निवेदन आज भारतीय जनता पार्टी महिला आघाडी तर्फे मुक्ताईनगर येथे तहसीलदार यांना देण्यात आले.
बीड जिल्ह्यातील परळी येथील पूजा लहू चव्हाण या मुलीने पुणे येथील एका इमारतीवरून उडी घेऊन अठरा वीस दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. या आत्महत्येप्रकरणी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील वनमंत्री संजय राठोड यांचा संबंध असल्याची चर्चा सदर घटनेपासून प्रसार माध्यमे सोशल मीडिया वर्तमानपत्रांमध्ये झळकत आहे. या घटनेस आज वीस दिवस उलटून सुद्धा पोलिसात द्वारे कोणत्याही प्रकारची नोंद घेण्यात आलेली नसून प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित होत असलेले फोटो ऑडिओ क्लिप मध्ये मृत्यू पूजा चव्हाण व वन मंत्री संजय राठोड यांचा स्पष्ट संबंध असल्याचे दिसत आहे. परंतु सदर प्रकरणांमध्ये वन मंत्री संजय राठोड यांच्यावर येवढे आरोप होऊन सुद्धा मान्य मुख्यमंत्री , गृहमंत्री तसेच पोलीस विभाग यांच्यामार्फत कुठल्याही प्रकारची चौकशी होत नसल्यामुळे महाविकास आघाडी सरकार महिलांबाबत किती गंभीर आहे हे दिसून येत आहे. तरी भारतीय जनता पार्टी महिला आघाडी तर्फे पूजा चव्हाण यांचा संशयास्पद मृत्यू ची तात्काळ चौकशी होऊन वन मंत्री संजय राठोड यांचा तत्काळ राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी महिला आघाडी करत आहे. अन्यथा भारतीय जनता पार्टी महिला आघाडी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मुक्ताईनगर भारतीय जनता पार्टी महिला आघाडी यांनी दिला आहे. सदर निवेदन देतांना नगराध्यक्ष नजमा इर्फान तडवी , उपनगराध्यक्ष मनीषा प्रविण पाटील , कविता प्रकाश बडेकर, कुंदा अनिल पाटील , नगरसेविका उषा दलपत चव्हाण हे उपस्थित होते.