Home धर्म-समाज भारतीय जनता ट्रेड युनियनच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अ‍ॅड. अभिजीत मेने

भारतीय जनता ट्रेड युनियनच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अ‍ॅड. अभिजीत मेने

0
37


adv abhijit mene

भुसावळ प्रतिनिधी । येथील विधीज्ज्ञ अ‍ॅड. अभिजीत मेने यांची भारतीय जनता ट्रेड युनियनच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

येथील अ‍ॅड. अभिजीत अजय मेने यांची नुकतीच भारतीय जनता मजदूर ट्रेड युनियन च्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. संबंधीत निवड ही युनियन चे राष्ट्रीय अध्यक्ष शांत प्रकाश जातव यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष-राजू चव्हाण यांनी केली. आगामी काळात सदर युनियनच्या माध्यमातून आपण असंघटित कामगार तसेच संपूर्ण कामगार वर्ग च्या हित आणि विकास साठी लोकशाही मार्गाने चळवळ उभी करून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती अ‍ॅड. अभिजीत मेने यांनी दिली आहे.


Protected Content

Play sound