मुंबई (प्रतिनिधी) १३० कोटी भारतीयांची खासगी माहिती धोक्यात आहे म्हणून सरकारने ५९ मोबाइल अॅपवर बंदी घातली. याच निकषावर वापरकरर्त्यांची माहिती गोळा करणारे, परस्पर खासगी सेटिंग बदलणारे आणि वापरकर्त्याचा डेटा भारताबाहेरच्या परदेशातील कंपन्यांना पाठवणारे नमो अॅपही बंद केले पाहिजे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
पूर्व लडाखमध्ये झालेल्या संघर्षानंतर सोमवारी रात्री उशिरा भारताने ५९ चिनी अॅप्सवर बंदी घातली. काही दिवसांपूर्वीच भारतीय गुप्तचर यंत्रणांनी ५२ धोकादायक चिनी अॅप्ससंदर्भात इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. टिक-टॉक, यूसी ब्राऊझर, झेंडर, शेअर इट, क्लीन मास्टर यांसारख्या अॅप्सचा समावेश आहे. यावरून कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वापरकरर्त्यांची माहिती गोळा करणारे, परस्पर खासगी सेटिंग बदलणारे आणि वापरकर्त्याचा डेटा भारताबाहेरच्या परदेशातील कंपन्यांना पाठवणारे नमो अॅपही बंद केले पाहिजे, अशी मागणी केली आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी .#BanNaMoApp हा हॅशटॅगही ट्रेंड केला आहे.