मुंबई (वृत्तसंस्था) आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाल्यामुळे दिल्ली आणि मुंबईसह देशातील विविध शहरांमध्ये पेट्रोल दर कमी झाले आहेत. देशात आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 23 ते 26 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली.
भारतातील इंधन कंपन्या पेट्रोलियम पदार्थांचे दर दररोज निश्चित करतात. याचे दर आंतरराष्ट्रीय बाजारानुसारही ठरवले जातात. आखाती देश आणि रशियातील तेलाच्या किमतीवरुन सुरु असलेल्या वादामुळे, क्रूड ऑईलच्या किमती तब्बल 30 टक्क्यांनी घसरल्या. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारात पाहायला मिळाला. तेल-गॅस कंपन्यांचे शेअर्स घसरले. दिल्लीत पेट्रोलच्या दरात 24 पैसे तर डिझेलच्या दरात 25 पैशांची घसरण झाली आहे. तर मुंबईत पेट्रोल 24 आणि डिझेल 26 पैशांनी स्वस्त झाले आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 23 पैसे तर डिझेल 25 पैशांनी स्वस्त झाले. तर चेन्नईमध्ये पेट्रोलच्या दरात 25 पैसे आणि डिझेलच्या दरात 26 पैशांनी कपात झाली आहे.