नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५२,९७२ नवीन रुग्ण आढळले असून ७७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात जास्तीत जास्त रुग्ण वाढण्याच्या बाबतीत आज भारताने अमेरिका आणि ब्राझीलला मागे टाकले आहे.
देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १८ लाख ०३ हजार ६९६ झाली आहे. यातील ५ लाख ७९ हजार ३५७ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तर ३८ हजार १३५ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. या सगळ्या दिलासादायक बाब म्हणजे देशात तब्बल २ कोटी लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. रविवारी एकाच दिवसात ३.१८ लाख लोकांचा चाचण्या करण्यात आल्या. तर, देशात एकाच दिवसात जवळजवळ ४१ हजार रुग्ण निरोगी झाले आहे. यासह एकूण निरोगी रुग्णांची संख्या आता ११ लाख ८६ हजार झाली आहे. यासह देशाचा रिकव्हरी रेट 65.८ टक्के झाला आहे. अमेरिकेत गेल्या २४ तासांत ४७ हजार तर ब्राझीलमध्ये २५ हजाराहून अधिक नवीन रुग्ण वाढले आहेत.