भारतात कोरोना समूह संसर्गाच्या टप्प्यात

नवी दिल्लीः वृत्तसंस्था । भारतात कोरोना समूह संसर्गाच्या टप्प्यात पोहोचला असल्याची कबुली केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी रविवारी दिली. पण हा समूह संसर्ग केवळ काही जिल्हे आणि राज्यांपुरता मर्यादित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विधानानंतर त्यांनी ही माहिती दिली. राज्यात कोरोनाचा समूह संसर्ग सुरू झाल्याचं ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या.

इतर राज्यांमध्ये देखील समूह संसर्ग सुरू आहे का? असा प्रश्न हर्षवर्धन यांना केला गेला. ‘ ‘पश्चिम बंगालसह विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या भागात समूह संसर्ग प्रसार होण्याची शक्यता आहे. खास करून दाट लोकवस्तीत हा संसर्ग होण्याची शक्यता आहे. पण समूह संसर्ग हा संपूर्ण देशभरात नाहीए. हा फक्त मार्यादित राज्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्येच आहे’, असं हर्षवर्धन म्हणाले.

प्रादुर्भावानंतर आरोग्यमंत्र्यांनी पहिल्यांदा समूह संसर्गाची कबुली दिली आहे. यापूर्वी त्यांनी नेहमी समूह संसर्गाचा इन्कार केला होता. या आठवड्याच्या सुरुवातीला ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या नागरिकांना दुर्गापूजा उत्सवात सतर्क राहण्याचं आवाहन केलं होतं. ‘

 

Protected Content