भारतात कोरोनाचा समूह संसर्ग झालेला नाही ; आयसीएमआरचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील लोकसंख्येनुसार एक टक्क्यांहून कमी लोकांपर्यंत कोरोनाचा संसर्ग झाला असल्याने, देशात कोरोनाचा समूह संसर्ग झाला असल्याचे म्हणणे चुकीचे असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (ICMR) सांगण्यात आले आहे.

 

भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक बलराम भार्गव यांनी म्हटलेय की, कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण छोट्या जिल्ह्यांमध्ये एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर शहरी भागात संसर्गाचे प्रमाण एक टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे भारतासारख्या मोठ्या देशात कोरोनाचा समूह संसर्ग अजूनही झालेला नाही. दरम्यान, मुंबई, दिल्लीसह देशातील काही महत्वाच्या शहरांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अचानक झपाट्याने वाढू लागल्याने देशात कोरोनाचा समूह संसर्ग सुरु झाल्याचे बोलले जात होते. परंतू बलराम भार्गव यांनी याबाबत स्पष्टीकरण दिल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

Protected Content