भारताची दुसरी आण्विक पाणबुडी खोल समुद्रात जाण्यासाठी सज्ज

नवी दिल्ली वृत्तसंस्था । देशातील दुसरी आण्विक पाणबुडी २०२० च्या अखेरीपर्यंत खोल समुद्रात जाण्यासाठी सज्ज झालीय. ‘आयएनएस अरिघात’चं जवळपास तीन वर्षांपर्यंत समुद्रात ट्रायल सुरू होतं. २०१७ मध्ये या पानबुडीचं लॉन्चिंग अतिशय गुप्त पद्धतीनं पार पडलं होतं. या पाणबुडीचं नामकरण अगोदर ‘आयएनएस अरिदमन’ करण्यात आलं होतं परंतु, लॉन्चिंगच्या वेळी या नावात बदल करण्यात आला .

अरिहंत क्लासची ही दुसरी पानबुडी वर्षाच्या अखेरीपर्यंत नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट होऊ शकते. विशाखापट्टनमच्या शिपबिल्डिंग सेंटरमध्ये अॅडव्हान्स टेक्नोलॉजी वेसल प्रोजेक्ट अंतर्गत ही पाणबुडी तयार करण्यात आलीय.

भारताची पहिली बॅलिस्टिक आण्विक पानबुडी ‘आयएनएस अरिहंत’ आहे. आयएनएस अरिहंत २००९ साली लॉन्च करण्यात आली होती. नऊ वर्षांच्या प्रदीर्घ काळाच्या ट्रायलनंतर ती ऑगस्ट २०१६ मध्ये नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली होती.

समुद्राच्या पृष्ठभागावर ही पानबुडी प्रती तास १२-१५ समुद्री मैल (२२-२८ किलोमीटर) वेगाने प्रवास करू शकते . तर खोलवर समुद्राच्या पाण्यात याचा वेग २४ नॉटस् (४४ किलोमीटर) प्रती तास होतो . आयएनएस अरिघात आपल्यासोबत १५ सागरी मिसाईल वाहून नेऊ शकतात. या मिसाईलची रेंज ७५० किलोमीटर आहे . या पानबुडीवर चार के-४ मिसाईल तैनात केल्या जाऊ शकतात. या मिसाईलची रेंज ३५०० किलोमीटरपर्यंत आहे. सध्या के-४ मिसाईलच्या निर्मितीचे काम सुरू आहे . आयएनएसस अरिघात हेदेखील आयएनएस अरिहंत प्रमाणेच एक बॅलेस्टिक मिसाईल सबमरीन आहे. ६००० टन वजन आणि ११२ मीटर लांब ही पानबुडी देशातच तयार करण्यात आलेल्या ८० मेगावॅटच्या न्युक्लिअर पॉवर प्लान्टच्या सहाय्याने धावते. या पाणबुडीमुळे नौदलाची ताकद आणखीन वाढणार आहे.

जगातील सर्वात शक्तीशाली नौसेना असणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा क्रमांक आघाडीवर लागतो. भारतीय नौसेनेकडे एक एअरक्राफ्ट कॅरिअर (विमानवाहू युद्धनौका) आहे. याशिवाय एक अॅम्फीबिअस ट्रान्सपोर्ट डॉक, ८ लँडींग शिप टँक, १० डिस्ट्रॉयर, १३ फ्रिजेटस्, १ न्युक्लिअर पॉवर्ड अटॅक सबमरीन, २ बॅलेस्टिक मिसाईल पानबुड्या, १५ पारंपरिक अटॅक पानबुड्या, २३ कॉरवेटस्, १० पेट्रोलिंग जहाज, ४ फ्लीट टँकर् आणि अनेक जहाजं आहेत. याशिवाय कोस्ट गार्डकडेही जवळपास १५० हत्यारसज्ज छोटे-मोठे जहाज आहेत.

=====================

Protected Content