भारताचा अमेरिकेशी पायाभूत सहकार्याचा करार

नवी दिल्ली: वृत्तसंस्था । भारत आणि अमेरिकेदरम्यान एतिहासिक बेका करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दोन्ही देशांदरम्यान चर्चा झाली. या चर्चेत दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांचा आणि परराष्ट्र मंत्र्यांचा समावेश होता.

या बैठकीनंतर दोन्ही देशांतर्फे एक संयुक्त निवेदन जारी करण्यात आले आहे. दोन्ही देशांदरम्यान BECA करारावर हस्ताक्षर करण्यात आले. या बरोबरच अणु सहकार्याबाबत देखील चर्चा करण्यात आले. बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही देशांनी चीनला कडक संदेश देखील दिला.

भारत आणि अमेरिकेची मैत्री सतत मजबूत झाली असून बैठकीत दोन्ही देशांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बैठकीनंतर सांगितले. यात करोना संकटाच्या नंतरची स्थिती, जगभरातील सद्यस्थिती आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर विस्ताराने या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. आता दोन्ही देशांनी अणु सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने पावलं उचलली असल्याचे सिंह म्हणाले. या बरोबरच भारतीय उपमहाद्वीपात सुरक्षेच्या स्थितीबाबत विस्ताराने चर्चा करण्यात आली.

पाच करारांवर बैठकीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या सध्याच्या स्थितीमध्ये भारत आण अमेरिकेची मैत्री केवळ आशियासाठी नाही, तर संपूर्ण जगाच्या दृष्टीने महत्वाची असल्याचे अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क एस्पर यांनी म्हटले. चीनकडून संपूर्ण जगाला धोका वाढत चालला आहे. अशात मोठ्या देशांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले. भारत, जपान आणि अमेरिका संयुक्तपणे अनेक सैन्य युद्धाभ्यास करणार असल्याचेही ते म्हणाले. या व्यतिरिक्त दोन्ही देश डिफेन्स इन्फॉर्मेशन शेअरिंगच्या नव्या वळणावर पुढे सरकत असल्याचेही ते म्हणाले.

आजच्या बैठकीत केवळ भारत आणि अमेरिका या दोन देशांशी संबंधित मुद्यांवरच चर्चा झाली असे नाही, तर याचा परिणाम संपूर्ण जगावर काय होईल, यावर देखील मंथन केले गेले, असे भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले.

Protected Content